अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरात स्थित हॉटेल जिव्हाळा गार्डनच्या मागील बाजूस असलेल्या एका कपाशी गोडाऊनला आज (बुधवार) पहाटे अंदाजे चारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस चाळीसगावात रक्तदान शिबिराने साजरा
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.अग्निशामक दलास माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले असून परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी देखील घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शॉर्ट सर्किट किंवा अन्य कोणत्या कारणांमुळे आग लागली याचा प्राथमिक अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून नुकसानाच्या अधिकृत आकडेवारीची प्रतिक्षा आहे.
