अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरराव नगर, डी.एन.सी. कॉलेजजवळील १०० फुटी रोड परिसरात एक इसम गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक सौ. कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
तांब्याच्या तार चोरी प्रकरणातील फरार आरोपी अखेर गजाआड; ५० किलो तारासह मुद्देमाल जप्त
पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ. शशिकांत पाटील, पोहेकॉ. प्रदीप नन्नवरे, पोकॉ. रविंद्र सावळे, पोकॉ. निलेश घुगे, पोकॉ. नवजित चौधरी व पोकॉ. रविंद्र तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक शंकरराव नगर परिसरात पोहोचले असता गणेश पार्क चौकाजवळ दगडाच्या ढिगाऱ्यावर एक इसम बसलेला दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच तो इसम पळू लागला. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.
त्याने स्वतःचे नाव स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर (वय २२, रा. शंकरराव नगर, डी.एन.सी. कॉलेज जवळ, जळगाव) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे मॅगझिन नसलेले पिस्तूल, तर पँटच्या खिशात एक मॅगझिन व त्यात ५ जिवंत काडतुसे मिळून आली.
जप्त मुद्देमाल गावठी पिस्तूल – अंदाजे किंमत ₹२०,०००/-मॅगझिन व ५ जिवंत काडतुसे – अंदाजे किंमत ₹५,०००/-एकूण किंमत: ₹२५,०००/मिळून आला आहे.याप्रकरणी पोलीस नाईक रविंद्र साबळे यांनी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, गुन्हा रजिस्टर नं. १८२/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
