अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मागील काही वर्षांपासून गहाळ झालेल्या मोबाईल फोनसंदर्भात नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीवर अखेर शहर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. सायबर पोलीस स्टेशन जळगावच्या तांत्रिक मदतीने चाळीसगाव पोलिसांनी एकूण २५ मोबाईल संच, अंदाजे किंमत सुमारे २ लाख १० हजार रुपये, हस्तगत करून मूळ मालकांच्या ताब्यात परत दिले.
दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मा. सौ. कविता नेरकर, अप्पर पोलिस अधीक्षक चाळीसगाव आणि मा. विजयकुमार ठाकुरवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव यांच्या हस्ते मोबाईल संच परत करण्यात आले.

ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. सौ. कविता नेरकर (अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव) आणि मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कामगिरीत शहर पोलिस स्टेशनचे पोनि अमितकुमार मनेळ, पोकॉ शरद पाटील, पोकॉ नरेंद्र चौधरी, पोकॉ मोहन सुर्यवंशी, पोना सचिन सोनवणे, पोना ईश्वर पाटील, पोकॉ गौरव पाटील, पोकॉ मिलिंद जाधव तसेच सायबर पोलीस स्टेशन जळगावचे कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग राहिला.

पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असून गहाळ मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांमधून पोलिस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक होत आहे.
