अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव एम.आय.डी.सी. परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रिज या कंपनीतून अज्ञात इसमांनी ४० हजार रुपये किंमतीच्या कॉपरच्या पट्ट्या चोरी केल्या होत्या. याबाबत कंपनीचे मॅनेजर बाळु गोवर्धन पाटील, रा. सुनंदनी पार्क, खेडी रोड, जळगाव यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी कंपनीत काम करणाऱ्या तिघांनी केल्याचे समोर आले. यामध्ये ओम रामेश्वर पोपटकर (२०), रा. वाघनगर, जळगाव,रोहित उर्फ रोहन भिकन मराठे (२२), रा. कासमवाडी, जळगाव,सागर थर्मेंद्र सपकाळे (१९), रा. वाघनगर, जळगाव
या तिन्ही युवकांचा समावेश असून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर व सिद्धेश्वर डापकर यांनी सहभाग घेतला.
आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली असून पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. रामकृष्ण पाटील करीत आहेत. आरोपींकडून अशा आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
