अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने इंस्टाग्राम वर बनावट खाते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत खात्यावरून जिल्हा प्रशासनाने माहिती दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ayush.prasad.14 या नावाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने खाते इंस्टाग्राम वर तयार करण्यात आले आहे त्या खात्याच्या डिपी वर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा फोटो असून हे खाते बनावट असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर या बाबत माहिती दिली आहे.त्या बनावट खात्याला पत्रकार,समाजसेवक व विविध पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील फॉलो केले आहे.एकूण 791 लोकांनी त्या बनावट खात्याला फॉलो केले असल्याचे दिसत आहे.यामुळे काही गैर प्रकार घडायला नको यामुळे तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेज वरून काही महत्वपूर्ण सूचना देखील नागरिकांसाठी देण्यात आल्या आहेत.त्या खालील प्रमाणे आहे.
महत्वाची सूचना
इन्स्टाग्रामवर कलेक्टर आयुष प्रसाद यांच्या नावाने बनवलेले हे खाते ayush.prasad.14 बनावट आहे.
कृपया नोंद घ्यावी
सदर खाते आयुष प्रसाद यांचे नसून त्यांच्याशी कोणताही संबंध नाही.
आयुष प्रसाद यांचे कोणतेही वैयक्तिक सोशल मीडिया खाते नाही.
नागरिकांनी अशा खात्यांना फॉलो करू नये, संदेश स्वीकारू नये किंवा संपर्क साधू नये.
जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या अधिकृत माध्यमांवर प्रकाशित केलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा.
आपली सजगता हीच चुकीच्या माहिती व गैरवापराविरुद्धची सुरक्षा आहे.
अश्या जिल्हाधिकारी जळगाव या अधिकृत फेसबुक पेज वरून महत्वाच्या सूचना देत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
