अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- २९ ऑगस्ट २०२५ स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अवैधरीत्या गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ साठवून ठेवणाऱ्या दोन इसमांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा, किंमत रु. १,९४,३४०/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेले प्रकार असे की
दि. २८ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पो.उ.नि. शरद बागल यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत न्हावी शिवारातील पत्र्याच्या घरात दोन इसम अवैधरित्या गांजा बाळगून त्याची विक्री करण्याचा तयारीत आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर व यावल पोलीसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला.
अटक आरोपी
१) रगन सुकराम बारेला (वय ३२, रा. महादेव शिरवेल, ता. भगवानपूरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश)
२) अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी (वय २७, रा. सिद्धबलपुर, वेगलूरु, कर्नाटक)
या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही संयुक्त कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी यावल पोलीस ठाण्याचे पोनि. रंगनाथ धारवळे, फैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि. रामेश्वर मोताळे तसेच गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या यशस्वी कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे.
