अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बेलदारवाडी शिवारात दुर्दैवी घटना घडली आहे. विजेच्या तारेचा शॉक बसून दोन म्हशी व दोन पारड्यांचा मृत्यू झाला असून अंदाजे ३ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेलदारवाडी येथील राजु बाबुराव कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविले की, दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर आश्रमाजवळील डोंगरी नदीकाठावर त्यांच्या जनावरांना चारण्यासाठी नेले असता, एम. एस. ई. बी. ची एल. टी. वीज वाहिनी तुटून खाली पडली. त्या तारांमध्ये प्रवाह सुरू असल्याने जनावरांना शॉक बसला आणि दोन म्हशी (किंमत १,८०,०००/- रुपये) व दोन पारडी (प्रत्येकी किंमत ६०,०००/- रुपये) एकूण किंमत ४ लाख रुपयांचे चार जनावर जागीच ठार झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी पंचांना बोलावून इन्क्वेस्ट पंचनामा केला. पंचांच्या उपस्थितीत जनावरांच्या मृतदेहाची पाहणी करण्यात आली. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो. नि शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र रावते करीत आहे
