अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
निंभोरा (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून निंभोरा, सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर परिसरात शेतकरी वापराचे साहित्य, तोलकाट्यावरील बॅटरी-इन्व्हर्टर साहित्य तसेच मोटारसायकल, कार चोरीच्या घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ होत होती.या घटनांचा तपास करण्यासाठी निंभोरा पोलिसांनी साकळी पद्धतीने नाकाबंदी, रात्रगस्त करून आणि आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करत गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली.
दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता संशयित आरोपी विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे रा. वडगाव नदीकाठी याच्या झोपडीवर छापा टाकण्यात आला असता तो पसार झाला मात्र त्याची सोबती महिला हाती लागली. चौकशीतून उघड झाले की विलास हा आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी करत होता व चोरीचा माल जमील तडवी यांच्या मदतीने निंभोरा येथील स्वप्नील चौधरी याला विकत असल्याची कबुली मिळाली. त्यानंतर पोलीसांनी मुख्य सूत्रधार स्वप्नील चौधरी यास अटक करून त्याच्या घर व गोडावून मधून चोरी केलेला मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.

या टोळीकडून एच.टी.पी. पंप मशिन ५, मोठ्या साईजच्या बॅटऱ्या ११, लहान बॅटऱ्या ३, इन्व्हर्टर मशिन ७, मोटारसायकली ४, पावर ट्रॉली लहान ट्रॅक्टर २, नॅनो कार १, सोलर प्लेट २, मटेरियल बॅग ११, ठिबक नळ्या ३ बंडल तसेच इतर शेती व इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण १२ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी मुख्य आरोपी विलास वाघोदे (फरार) याच्यासह एक महिला, गोपाळ भोलनकर, आकाश घोटकर, अर्जुन सोळंकी, जमील तडवी, स्वप्नील चौधरी, राकेश तडवी, ललित पाटील, राहुल ऊर्फ मयुर पाटील अशी १० जणांची टोळी उघड झाली असून त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनचे ५, यावलचे २, रावेरचे १, मुक्ताईनगरचे १, सावदा पोलीस स्टेशनचा १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि हरीदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत निंभोरा पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सक्रिय सहभाग होता. या धडाकेबाज कामगिरीमुळे शेतकरी व परिसरातील नागरिकांत पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
कारवाईत सहभागी
सपोनि हरिदास शिवराम बोचरे यांच्या नेतृत्वाखाली मपोउनि दिपाली पाटील, मपोउनि ममता तडवी, पोहेकॉ सुरेश अढायंगे, पोहेकॉ बिजु जावरे, पोहेकॉ रिजवान पिंजारी, पोना अविनाश पाटील, पोकॉ किरण जाधव, पोकॉ रशिद तडवी, पोकॉ सर्फराज तडवी, पोकॉ रफिक पटेल, पोकॉ अमोल वाघ, पोकॉ प्रभाकर ढसाळ, पोकॉ प्रशांत चौधरी, पोकॉ महेंद्र महाजन, पोकॉ परेश सोनवणे, पोकॉ भुषण सपकाळे, पोकॉ सुभाष शिंदे, तसेच चालक पोहेकॉ योगेश चौधरी व पोकॉ राहुल केदारे यांचेसह महिला पोलीस अंमलदार यांनी केली आहे. त्याच प्रमाणे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि सोपान गोरे, पोहेकॉ प्रितम पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील, पोकॉ प्रदिप चवरे, पोकॉ प्रदिप सपकाळे, पोकॉ मयुर निकम, पोकॉ सचिन घुगे यांचा या धडाकेबाज कारवाईत सहभाग होता.
