अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- धुळे–चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ आज दुपारी १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.मृत व्यक्तीची ओळख भागवत पाटील (रा. पिराचे बोरखेडा) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक HR 74 BO 450 या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडकेत मोटारसायकल ट्रकच्या पुढील भागात अडकून चिरडली गेली. अपघात इतका गंभीर होता की भागवत पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
