अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
जळगाव(प्रतिनिधी)- शिवाजीनगर परिसरात कुणाच्या घरात आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाची वेळ… कुणीही हाक देण्याआधी जो माणूस धावून येतो, तो म्हणजे अब्दुल रहीम अब्दुल रहीम हक शेख – सर्वांना परिचित असलेले बाबु दादा. कोणताही राजकीय पदाचा आधार नाही, सत्तेचा गजर नाही; पण गेल्या ३० वर्षांपासून माणुसकीच्या बळावर उभा असलेला हा चेहरा आज संपूर्ण शिवाजीनगरचा आधारवड ठरला आहे.
आजारी व्यक्तीसाठी रुग्णालयात मदत असो, गरीब कुटुंबासाठी औषधोपचार, अंत्यविधीपासून ते लग्नकार्यापर्यंतची धावपळ असो, की एखाद्या कुटुंबावर कोसळलेले संकट असो – बाबु दादा कायम पुढे. “हे माझं कर्तव्य आहे,” असं साधं वाक्य बोलून त्यांनी आयुष्यभर समाजसेवेची मशाल पेटती ठेवली.
कधीही प्रसिद्धीचा मोह नाही, कधीही पदाची अपेक्षा नाही. लोकांच्या प्रेमावर आणि विश्वासावर जगणारा माणूस म्हणजे बाबु दादा. त्यांच्या मदतीची यादी कुठेही लिहिली गेलेली नाही, पण शिवाजीनगरमधील असंख्य घरांच्या आठवणीत ती कोरलेली आहे.
आजपर्यंत जनतेसाठी झटलेला हा माणूस, आज त्याच जनतेच्या आग्रहावरून महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून बाबु दादा जनतेसमोर उभे राहिले आहेत. “मी तुमच्यासाठी नेहमी उभा होतो, आता तुमच्या प्रश्नांसाठी अधिकृतपणे लढायची संधी द्या,” ही त्यांची भावूक साद आहे.
परिसराचा विकास, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, युवकांसाठी संधी, महिलांचे प्रश्न आणि ज्येष्ठ नागरिकांचे सन्मानाने जगणे – हे सारे मुद्दे त्यांनी आपल्या मनात आणि कृतीत जपले आहेत. सत्ता नाही, राजकारणाची भाषा नाही, फक्त सेवेची ओळख आणि माणुसकीचा अजेंडा घेऊन बाबु दादा मैदानात उतरले आहेत.
आज शिवाजीनगरमधील नागरिकांच्या ओठांवर एकच चर्चा आहे –“जो माणूस ३० वर्षे आमच्या सुखदुःखात उभा राहिला, तोच खरा प्रतिनिधी.”
ही निवडणूक केवळ उमेदवारीची नाही, तर माणुसकी, विश्वास आणि निस्वार्थ सेवेच्या विजयाची लढाई ठरणार आहे.
