अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)- 7 जुलै रोजी नदीवर कठडे नसल्याने अपघातात तरुण नदीपात्रात पडून त्याचा सुदैवाने जीव वाचला मात्र स्थानिक प्रशानाचे मात्र नदीवरील संरक्षण कठडे दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष,याकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे आज दि 11 जुलै रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन.
मागच्या वर्षी आलेल्या पुरामुळे चाळीसगांव शहातील जवळपास सर्व नदी वरील पुलांचे लोखंडी संरक्षण कठडे वाहुन गेले आहेत . जवळपास एक वर्ष होऊन गेला तरी स्थानीक प्रशासन व लोक प्रतिनीधी याकडे दुर्लक्ष करीत आहे, दयानंद हॉटेल जवळ असलेला नदीवरील नवीन गाव व जुन्या गावाला जोडणारा अत्यंत महत्त्वाच्या पुलांपैकी एक नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या रहदारीचा व महत्वाचा पुल असुन त्या पुलावर लोखंडी संरक्षण कठडे नसल्यामुळे दि . ७ जुलै रोजी एक तरुण मोटर सायकल सह नदी पात्रात पडल्याने त्याचा हात फॅक्चर झाला व मुका मार लागला त्याचा जीव सुदैवाने वाचला मात्र भविष्यात जीवितहानी जर टाळायची असेल तर या पुलासह शहरातील सर्व नदी पात्रावरील पुलांवर लोखंडी संरक्षण कठडे बसविण्यात यावे . जेणेकरून पुन्हा असे अपघात होणार नाही .तरी आपण अपघात होऊन एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव जाण्याची वाट न बघता लवकरात लवकर सदर काम मार्गी लावावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधानीक मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन वंचित बहुजन आघाडी तर्फे नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना देण्यात आले,निवेदनावर वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष सागर निकम, सोमनाथ मोरे, दीपक गुरव,सोनू जाधव,सोनू ढोकळे,भीमराव मोरे,मंगल ठाकूर सोनू आहिरे,स्वप्निल चव्हाण, मानव आव्हाड, सागर पाटील, अनिल मोरे ,बापू जाधव ,संजय जाधव, ईश्वर कुंभार ,सागर देवरे,अबरार बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.