अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील महात्मा फुले आरोग्य संकुलात कार्यरत ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस युनिटमध्ये दररोज पाच किडनी विकाराने त्रस्त रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत डायलिसिस सेवा घेत आहेत. 1 जानेवारी 2025 रोजी या युनिटचा शुभारंभ करण्यात आला होता.
या युनिटमध्ये एकूण पाच डायलिसिस मशीन उपलब्ध आहेत,त्यामुळे एका वेळी पाच रुग्णांना सेवा देता येते. सद्यस्थितीत १० रुग्ण नियमितपणे या सेवेचा लाभ घेत असून, दिवसाला सरासरी ५ रुग्णांची डायलिसिस प्रक्रिया केली जाते. या युनिटच्या माध्यमातून आजपर्यंत एकूण ४५० डायलिसिस प्रक्रियांचा यशस्वी पूर्णत्वास नेण्यात आले आहे.
युनिटचे इन्चार्ज प्रसाद मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून त्यांनाही लवकरच या युनिटचा लाभ मिळणार आहे. हे युनिट वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय डॉ. मंदार करंबेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्रपणे सुरू आहे.
युनिटमध्ये वरिष्ठ टेक्निशियन मनोज राठोड, नर्सिंग स्टाफ जयश्री शिंदे, हाऊस कीपिंग कर्मचारी ईश्वर राजपूत आणि आरोग्य मित्र व डाटा ऑपरेटर प्रणव मोरे यांच्या समन्वयाने ही सेवा यशस्वीरित्या सुरू आहे. या उपक्रमामुळे किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

“चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डायलिसेसची सुविधा सुरु झाली आहे. यामुळे आता किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या सर्व सुविधा मोफत आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरू होणारे हे पहिले ग्रामीण रुग्णालय आहे. तसेच १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु असूनही तेही लवकरच कार्यान्वित होईल व रुग्णांना छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव व धुळे जाण्याची गरज भासणार नाही” – आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव

खाजगी रुग्णालयात अडीच ते तीन हजार रुपये होणारा गरीब रुग्णांचा खर्च ग्रामीण रुग्णालयात मोफत डायलिसिस सेंटर सुरु झाल्याने वाचणार आहे.सध्या पाच बेड – सुरू आहेत. डायलिसेसची गरज असलेल्या १० रुग्णांचे ४५० वेळा डायलिसिस करण्यात आले. यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे- डॉ. मंदार करंबेळकर, वैद्यकीय अधीक्षक चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय
