अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- येथील छत्रपती शाहू महाराज मराठा समाज परिवर्तन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.डी.एस.मराठे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ जुन २०२५ रोजी दुपारी २ वाजता छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रम जनसेवा पतपेढी मिटिंग हाॅल नेताजी चौक चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सर्व प्रथम मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी परिवर्तन मंडळा संदर्भात संपूर्ण लेखाजोखा मांडला त्या नंतर मंडळाचे उपाध्यक्ष श्री. गुलाबराव गायके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी श्री.डी.एस.मराठे, श्री.गुलाबराव गायके,श्री. राजेश मांडोळे,श्री.गोकुळ कोल्हे,श्री.माणिक गुंजाळ, यांनी मंडळाच्या संदर्भात संघटनात्मक संरचना आणि मंडळाच्या माध्यमातून कसे समाज कार्य झाले पाहिजे.या बाबत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मंडळाचे ग्रामीण उपाध्यक्ष-श्री.गोकुळ कोल्हे खडकी,सहकार्याध्यक्ष- सुशांत मांडोळे,सचिव- श्री.माणिक गुंजाळ, सहसचिव-श्री.डाॅ.अभय शेळके,समन्वय श्रीमती सिमा माळदकर,सदस्य-श्री.अशोकराव जगताप,श्री.प्रविण गुंजाळ,श्री.राजेश मांडोळे, श्री.संजय मानकर,श्री. अशोकराव कोल्हे,श्री. अंबादास काळे,श्री.चंद्रकांत पावसे-मराठे,श्री.फकिरा जाधव,श्री.रमेश गोल्हार, श्री.दगाजी गुंजाळ श्री.सुनिल मराठे,श्री.राहुल म्हस्के,श्री. गोकुळ शेलार,श्री.नंदकिशोर जाधव,श्री.रंजीत मांडोळे, श्री.रंगनाथ मांडोळे,श्री.वेदान्त गायकवाड,श्री.गौरव मांडोळे,चि.स्वामी मांडोळे यांच्यासह इतर समाज बांधव उपस्थित होते. आभार सचिव श्री.माणिक गुंजाळ यांनी मानले.
