Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड पुणे प्रवासी संघातर्फे प्रवाश्यांच्या विविध ज्वलंत व रास्त मागण्याचं स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन

0
0 0
Read Time2 Minute, 52 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दि.11 जुलै रोजी दौंड पुणे प्रवासी संघातर्फे प्रवाश्यांच्या विविध ज्वलंत व रास्त मागण्याचं निवेदन दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे अध्यक्ष मा. प्रेमसुखजी कटारिया. यांच्या स्वाक्षरीने स्टेशन व्यवस्थापक श्रीमान जयनाथ त्रिपाठी यांना देण्यात आलं
सर्व मुद्द्यावर विस्तृत चर्चा स्टेशन व्यवस्थापक यांच्या कार्यालयात करण्यात आली, सोलापूर विभागीय अधिकाऱ्याबरोबर लवकरात लवकर या सर्व समस्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यास स्वतः पाठपुरावा करिन असे आश्वासन दौंड स्टेशन व्यवस्थापकांनी दिले.
या वेळी दौंड – पुणे – दौंड प्रवासी संघाचे पदाधिकारी व दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दौंड पुणे प्रवासी संघाच्या मागण्या

१. गाडी क्रमांक ०१५३३ पुणे दौंड मेमू ( स्पेशल ) लोकल दौंडला फलाट क्रमांक चार ( ४ ) वर थांबवण्यात येते अनेक ज्येष्ठ नागरिक , महिला सदर मेमू लोकल ने प्रवास करतात त्यांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

२) दौंड रेल्वे दवाखान्याच्या समोर असलेले वाहनतळ त्वरित सुरु करण्यात यावे.

३)दौंड रेल्वे स्थानकात ये – जा करण्यासाठी लिफ्ट बसवण्यात आलेल्या आहेत , याची देखभाल योग्य रीतीने करावी अनेक वेळा सदर लिफ्ट बंदच असतात.

४)दौंड रेल्वे दवाखान्याच्या बाजूला असलेली तिकीट खिडकी पूर्ण वेळ सुरु ठेवावी.

५)दौंड रेल्वे स्थानकात येणाऱ्या आणि दौंड स्थानकातून जाणाऱ्या सर्व गाड्या रेल्वे पादचारी पुलाजवळच थांबाव्यात .

६)सकाळी ८.२५ ( गाडी क्रमांक ०१५२६ ) या नंतर थेट सायंकाळी ५.०२ ( गाडी क्रमांक ०१५३० ) मेमू लोकल आहे तरी दुपारी १२ वाजता एक मेमू लोकल दौंड वरून पुण्याकडे सोडण्यात यावी .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: