चाळीसगाव तालुक्यातील ऐतिहासिक कार्यास सुरुवात : दीनबंधु आंबेडकर आश्रम या संस्थेच्या नामफलकाचे अनावरण संपन्न..

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगांव(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली आणि या युगपुरुषाचे पवित्र हस्ते सन 1937 साली उद्घाटन झालेली चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील ऐतिहासिक संस्थेच्या पुनश्च उभारणीसाठी संस्थेचे कार्यकारी मंडळ या नात्याने चालविलेल्या प्रयत्नांची प्राथमिक वाटचाल म्हणून या संस्थेच्या नामफलक उद्घाटनाचा समारंभ आज दिनांक 24 जुलै 2022 रविवार रोजी संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष मा.साहेबरावजी घोडे (माजी आमदार चाळीसगाव) यांचे हस्ते तसेच जेष्ठ पत्रकार सर्वांचा ग्रामस्थ चे संपादक तथा ओबीसी नेते मा.किसनराव जोर्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक समारंभ पार पडला.
गेल्या दोन तीन दिवसांपासून तसेच कार्यक्रमाच्या वेळी देखील पावसाची सातत्याने रिपरिप चालू असताना बौद्ध समाज बाधवांनी व आंबेडकरी प्रेमींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दिली.
तालुक्यातील ज्येष्ठ तथा बौद्धाचार्य आयु भैय्यासाहेब ब्राम्हणे, जिप चे सेवानिवृत्त उपकार्यकारी अधिकारी तथा भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष आयु. अशोक पटाईत , ज्येष्ठ कार्यकर्ते आयु देविदास तात्या जाधव यांनी या प्रसंगी समयोचित विचार व्यक्त केले.
आंबेडकरी गायक आयु.रवींद्र निकम , महिला उपासक सौ.सोनालीताई लोखंडे ,परिसरातील नगरसेवक रोशन जाधव ,बापूभाऊ अहिरे , जगदीश चौधरी तसेच ज्येष्ठ नागरिक किसन आप्पा मोरे , महेंद्र जाधव , से.नि.फौजी संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब गरुड , सुरेश पगारे , कारभारी केदार , वसंतराव मरसाळे, मनोहर आंधळे सर, मनोज भाऊ जाधव, सौ.अलकाताई मोरे, शिवाजी जाधव गुरुजी , दिलीप जाधव ,रावसाहेब जगताप ,अमोल घोडे ,प्रा.सदावर्ते ,प्रा.नन्नावरे , शरद जाधव ,बबलू जाधव ,विजय जगन जाधव, बंटी उर्फ स्वप्नील जाधव यांचेसह अनेक समाज बांधव तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे सर्व समाजातील आंबेडकर प्रेमी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.
ज्येष्ठ सहकारी आयु.सुजित जाधव , दादासाहेब दाभाडे यांचे सह युवा कार्यकर्ते आयु.संभाआप्पा जाधव, स्वप्नील जाधव , दीपक बागुल ,प्रवीण जाधव, शाम जाधव ,नितीन मरसाळे ,विष्णू जाधव ,विश्वजित जाधव ,सागर निकम ,सोनू अहिरे, अवधेश बागुल यांनी कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उत्साहात पार पाडल्या.
संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपावेतो झालेल्या वाटचालीचा व इतिहासाचा आढावा संस्थेचे सचिव आयु.धर्मभुषण बागुल यांनी सविस्तरपणे सादर केला.आदरणीय दादासाहेब जोर्वेकर यांनी या प्रसंगी संस्थेला रू.5000 निधी जाहीर केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.समारोपाचे मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आण्णासाहेब घोडे यांनी या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नावाजलेल्या मान्यवरांची आठवण करून दिली.त्याच प्रमाणे संस्थेस इमारत उभारणीसाठी 4 कोटी 84 लाख रु.शासनाकडून मंजूर झाल्याचे तसेच हा निधी 10 कोटी पर्यंत वाढवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.
संस्थेचे युवा सदस्य ॲड.राहुल जाधव यांनी सुरेख सुत्रसंचालन केले तर सहसचिव आयु. रामचंद्र जाधव यांनी आभार मानले. त्याच संस्थेचे उपाध्यक्ष आयु. गौतम झाल्टे ,सदस्य आयु. गौतम जाधव , आयु.महेश चव्हाण यांनी चोख व्यवस्था ठेवली होती.
या छोट्याशा परंतु उत्साहवर्धक कार्यक्रमामुळे आंबेडकरी प्रेमी तसेच तालुक्यातील बौद्ध समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच ही ऐतिहासिक शिक्षण संस्था तालुक्यात पुन्हा दिमाखाने उभी राहील अशी ग्वाही कार्यकारी मंडळाच्या वतीने देतो.
या संस्थेचा अभिमानास्पद व गौरवशाली इतिहास आपल्याला स्वतंत्रपणे पाठविण्यात येणार आहे.
” या पवित्र व ऐतिहासिक कार्यास व संस्थेस उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करीत आहे.”