अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील विविध गावातील नागरिक शासकीय योजनांच्या कामासाठी चाळीसगाव पंचायत समिती कार्यालयात सतत ये-जा करत असतात. मात्र या कार्यालयातील स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दुर्दैवी तर आहेच पण भिंतींवर असलेला मद्याच्या रिकाम्या बाटल्या असणे लाजिरवाणी बाब आहे.
पंचायत समितीच्या पुरुषांच्या मुतारीच्या भिंतीवर चक्क देशी व विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसून येत आहे. ही बाब नियमितपणे येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीस पडत असून त्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय कार्यालयाच्या स्वच्छतागृहात अशा प्रकारे मद्यपान केल्याचे पुरावे मिळणे ही गंभीर बाब असून, हे कार्यालय स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टांना सडेतोड आव्हान देणारे ठरत आहे.
या प्रकाराकडे गटविकास अधिकारी व संबंधित प्रशासनाचे अजूनही लक्ष गेलेले नाही हे विशेष. शासकीय कार्यालयातच जर नियमांची पायमल्ली होत असेल, तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी, असा सवाल उपस्थित होतो.
स्थानिक नागरिकांनी यावर तात्काळ कार्यवाही करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून, गटविकास अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
