Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

JNU तील झुंडशाही विरोधात विद्यापीठात आंदोलन

0
0 0
Read Time2 Minute, 58 Second

औरंगाबाद(प्रतिनिधी):दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज दि ६/१/२०२० सोमवार रोजी सर्व विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले.
एबीव्हीपी, आरएसएस विरोधात जोरदार घोषनाबाजी करत मुख्य इमारतीसमोर जोरदार आंदोलन केले.

दिल्ली येथील जेएनयूमध्ये रविवारी सायंकाळी तोंडाला रुमाल बांधून हल्लेखोरांनी विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या वसतिगृहात घुसून हल्ला केला त्याच्या निषेधार्थ औरंगाबाद विद्यापीठात विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले वाय कॉर्नर ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत मानवी साखळी करण्यात आली. यावेळी एबीव्हीपी, गृहमंत्री अमित शहा, आरएसएसच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर पोहोचल्यानंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्यास समोर बसून तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांनी मुख्य इमारती समोरील रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. ‘स्टँड विथ जेएनयू, एबीव्हीपी मुर्दाबाद’ अशाप्रकारचे फलक घेऊन निषेध नोंदवला जात आहे.

एमआयएम विद्यार्थी आघाडी, एसएफआय, एनएसयुआय रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन, समता विद्यार्थी आघाडी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, एआयएसएफ, सत्यशोधक विद्यार्थी संघटना व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होते.

आंदोलनात कुणाल खरात,लोकेश कांबळे, नितीन वाव्हळे, सचिन निकम, अमोल खरात, अमोल दांडगे निलेश आंबेवाडीकर, मोहित जाधव, अतुल कांबळे, गुणरत्न सोनवणे, राजू पठाण, दीपक केदार,अमोल घुगे, अब्दुल रहमान आलम खान, ,समी अली खान , नासेर जोहरी ,शहरोज सिद्दीकी, नवाज कुरेशी,शाहबाज़ खान ,मोनाली अवसरमोल, जयश्री शिर्के,दीक्षा पवार आदींची उपस्थिती होती.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: