संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात लोकशाही दिनाचे 23 ला ग्रामीण भागात तर 24 तारखेला शहरात आयोजन करण्यात आले आहे. यात नागरीकांच्या समस्या जाणुन घेणे, त्यांचे निराकरण करणे, अर्ज स्विकारणे, विविध दाखल्यांचे वाटप असे उपक्रम राबविले जाणार असून नागरिकांनी यात सहभाग नोंदवत याचा लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.
भारत सरकारच्या कार्मिक लोकशिकायत आणि पेंशन मंत्रालयामार्फत “गुड गव्हर्नन्स विक” अंतर्गत, “प्रशासन गावकी ओर” ही विशेष मोहिम दिंनाक 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. सदर मोहिम अंतर्गत जिल्हाधिकारी जळगांव मा. श्री. आयुष प्रसाद यांनी आदेशीत केल्यानुसार तालुका स्तरावर तसेच महसुल मंडळ स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील सर्व महसुल मंडाळांच्या मुख्यालयी सर्व स्थानिक प्रशासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत नागरीकांच्या समस्या जाणुन घेणे, त्यांचे निराकरण करणे, अर्ज स्विकारणे, विविध दाखल्यांचे वाटप इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तालुकास्तरावरील लोकशाही दिनाचा कार्यक्रम आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी चाळीसगांव प्रमोद हिले यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजीत केला आहे. यावेळी सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील व विभागाशी संबंधीत नागरीकांच्या तक्रार अर्जाची स्विकृती व तातडीने कार्यवाही करण्यात येईल.
तरी तालुक्यातील ज्या नागरीकांचे प्रशासकीय कार्यालयात प्रलंबीत प्रश्न असतील त्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.
