अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती २६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय मराठा समाज विकास मंडळ, चाळीसगाव यांच्या बैठकीत घेण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष रमेश आबा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही नियोजन बैठक पार पडली.
१९७२ साली स्थापन झालेल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलसवासी देवराम भाऊ बिडे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आणि शाहू महाराजांच्या विचारांचे अनुकरण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. त्याची परंपरा आजही अखंडपणे सुरू असून, यंदाही शाहू महाराज जयंतीचे आयोजन विविध उपक्रम, व्याख्यानमाला व मिरवणुकीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वय समिती व उत्सव समितीची निवड करण्यात आली असून, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी योगेश (नाना) कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीस भाऊसाहेब तात्या जाधव (जि.प. सदस्य), विनायक मांडोळे, संजय कापसे, विलास बापू दुशिंग, निंबा भाऊ जगताप, मधु भाऊ गुंजाळ, संजय दुशिंग, एकनाथ माळकर सर, रोहित जाधव, बापू शिंदे (पत्रकार), विजय गायकवाड (पत्रकार), शांताराम कदम, धनंजय मराठे, विजय पांगारे, गौरव कापसे, शुभम मांडोळे, सुनील पाटील व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती सोहळा भव्य आणि उत्साहपूर्ण करण्यासाठी सर्व समाजबांधव, युवा कार्यकर्ते, भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रमेश आबा चव्हाण, माजी अध्यक्ष भीमराव महाराज चव्हाण तसेच मंडळातील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
