Oneness-Vann’ (वननेस-वन) शहरी वृक्ष समूह संत निरंकारी मिशन द्वारे हरित विश्वाकडे एक अर्थपूर्ण पाऊल

1 0
Read Time4 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

पुणे-१७ सप्टेंबर २०२१ : Oneness-Vann’ (वननेस-वन) नामक या परियोजनेचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला. संपूर्ण भारतातील विविध राज्यांच्या शहरांमध्ये निवडक ५०० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १,५०,००० हुन अधिक रोपांची लागवड करण्यात आली.

वननेस-वन नामक या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील नानगाव ब्रँच मधील खुटबाव आणि लोणावळा ब्रँच मधील कामशेत येथे ३५०० इतकी झाडे लावण्यात आली आहेत. त्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रभावाने आजुबाजूचे वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचू शकेल आणि स्थानिक तापमान सुद्धा नियंत्रणात राहील. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.
आज जेव्हा आमची धरती ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचा सामना करत आहे, अशा समयी वृक्षारोपणाचे महत्व आणखी अधिक वाढलेले आहे. सन २०२० पासून कोरोना संकटाने आपल्या सर्वांनाच प्रकृतीची अनमोल देणगी असलेल्या प्राणवायुचे म्हणजेच ऑक्सिजनचे महत्व काय आहे ते चांगले शिकवले आहे. शिवाय त्याच्या उणीवेमुळे उत्पन्न होणाऱ्या दुष्परिणामांशीही आम्हाला अवगत केले आहे.
‘गिव्ह मी ट्री संस्थेचे संस्थापक श्री स्वामी प्रेम परिवर्तन ( पीपल बाबाजी) यांनी पुणे झोनमध्ये खुटबाव या ठिकाणी करण्यात आलेल्या शहरी वृक्ष समूह प्रकल्पाला सदीच्छा भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले . खुटबाव या ठिकाणी राबविण्यात आलेला हा प्रकल्प संपूर्ण भारतदेशात राबविण्यात आलेल्या प्रकल्पांना एक रोल मॉडेल ठरेल अशा शब्दात त्यांनी या कार्याचे कौतुक केले . या परियोजने अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पाषाण ( सुतारवाडी) या ठिकाणी तिसऱ्या प्रकल्पाचे उदघाटन श्री पीपल बाबाजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मिशन आणि ‘गिव्ह मी ट्री ट्रस्ट’ च्या सहयोगात्मक प्रयत्नांतून साकार होत असलेला हा उपक्रम राष्ट्राला ‘पर्यावरण संरक्षणाच्या’ हेतुने एक नवे परिमाण स्थापन करण्यामध्ये मदत करील असा विश्वास त्यांनी प्रकट केला. संत निरंकारी मिशन आणि ‘गिव्ह मी ट्री संस्था’ यांच्या सहकार्यानेच एवढ्या मोठ्या स्तरावर ‘पर्यावरण संरक्षण’ विषयक या योजनेचा पाया घातला गेला आहे. ‘गिव्ह मी ट्री संस्था’ मागील 44 वर्षांपासून कार्य करत असून त्यांनी आतापर्यंत 3.25 करोड़ वृक्ष लावले आहेत.
यावेळी पुणे झोनचे झोनल इंचार्ज श्री.ताराचंद करमचंदानी,श्री. किशनलाल अडवाणी क्षेत्रीय संचालक पिंपरी क्षेत्र , श्री.पोपट तावरे क्षेत्रीय संचालक पुणे शहर, नानगाव सेक्टर संयोजक श्री.विलास रासकर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.