Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शाळेच्या बसच्या चालक-वाहक यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या खाजगी वाहतूक चालकावर कारवाई करा – अश्वमेध पब्लिक स्कुल च्या बस चालक व वाहक यांची मागणी

0
0 0
Read Time2 Minute, 50 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगाव – तालुक्यातील टाकळी प्र.दे येथील अश्वमेध पब्लिक स्कुलच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत आणणे व पोहचविण्याची जबाबदारी शाळेच्या बस चालक व वाहकांवर असते शाळेच्या बस वरील चालकाला दि १३ रोजी दुपारी १-३० वाजेच्या सुमारास माळशेवगे रस्त्यावर खाजगी वाहतूक करणाऱ्या चालकाने मद्यपान करून शिवीगाळ करत मारहाण केल्याने शाळेच्या चालकांमध्ये या प्रकारामुळे भीती निर्माण झाली आहे.तसेच बस पेटवून देण्याची धमकी दिल्याने विद्यार्थी व पालक देखील या प्रकाराने भयभीत झाले आहे. सदरचे प्रकार होत असल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक यांना अश्वमेध पब्लिक स्कुल च्या चालक व वाहकानी निवेदन देवुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हा प्रश्न फक्त एका स्कूल चा नसून या प्रकाराला बऱ्याच स्कूल बस चालकांना सामोरे जावे लागते त्यामुळे जेवढे प्राधान्य ऍम्ब्युलन्स ला दिले जाते तेवढेच विद्यार्थी गाडीत असलेल्या स्कूल बसेस ला दिले जावे आणि असे अनुचित प्रकार घडल्यास ज्या व्यक्तीकडून त्रास दिला जातो त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी ही मागणी म्हणून पोलीस निरीक्षकांनी संबंधित चालकाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शाळेच्या चालकानी व वाहकांनी दि १७ रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर अश्वमेध पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ.अश्विनीताई पाटील ,रयत सेनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोकुळ पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे , शहराध्यक्ष छोटू अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तसेच चालक-वाहकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: