अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – कालिंका माता मंदिराजवळ दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,अरुण पंडीत गुजर (वय ४४, रा. निमखेडी शिवार, समर्थ कॉलनी) हे आपल्या (एमच १९ बीई २७२०) क्रमांकाच्या दुचाकीवरून कालिंका माता मंदिराकडून अजिंठा चौफुलीकडे जात होते. यावेळी मागून वेगाने आलेल्या (एमएच ४६ बीयू ७२९७) क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की अरुण गुजर रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक चालक मुन्नेश लखू जाटम (रा. श्यामपुरा, खेरा, पोस्ट डोंचरा उमरी, जि. भिंड, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करत आहेत.
