अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दौंड तालुका व शहरी भागातील कलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रमास परवानगी मिळावी म्हणून अखिल भारतीय कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य दौंड यांच्यावतीने दौंड तहसीलदार व दौंड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले
दौंड तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागात अनेक कलावंत आहेत, त्यांची उपजीविका त्यांच्या कलेवर अवलंबून आहे परंतु गेल्या दोन वर्षांपासून सततच्या लॉकडाऊनमुळे कलाकारांच्या हाताला कोणतेही काम नाही त्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
सध्या कोरोणाची परिस्थिती संपूर्ण राज्यात सर्वत्र जनजीवन सुरळीत व प्रगती पथावर आहे असे असताना राजकीय पक्षाचे कार्यक्रम उदाहरणार्थ मोर्चे आंदोलन लग्नसमारंभ आधी सुरळीतपणे चालू आहेत मात्र कलाकारांना त्यांच्या कार्यक्रमास अथवा अभिनय गायन कौशल्य जागरण गोंधळ ऑर्केस्ट्रा भजनी मंडळ भारतीय वाद्य वाजविण्यास परवानगी दिली जात नाही त्यामुळे या सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे कलाकार यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या कलेवरच अवलंबून असल्याने व यातून आलेल्या नैराश्या मुळे अनेक कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत, यातूनच कलाकारांना सावरण्यासाठी शासनाच्या सर्व नियमांना अधीन राहून कलाकारांना यापुढे अडवणूक न करता त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात यावी परवानगी देता येत नसेल तर शासनाने कलाकारांना कुटुंबाच्या यासाठी दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे अन्यथा सर्व क्षेत्रातील कलाकारांना उपजीविकेसाठी रस्तावर येऊन आंदोलन छेडावे लागेल असे अखिल भारतीय कलाकार महासंघाचे अध्यक्ष भारत सरोदे यांनी म्हटले आहे यावेळी भारत सरोदे (अध्यक्ष) संतोष माने (उपाध्यक्ष) चंद्रकांत लोंढे (सचिव) संजय जाधव (खजिनदार) दत्तू घोडे (सहसचिव) व इतर कलाकार उपस्थित होते
