संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-गुड शेपर्ड अकॅडमी चाळीसगाव या ठिकाणी पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष 2024 -25 मध्ये विविध कला, क्रीडा प्रकारात तसेच विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमामध्ये अलौकिक यश संपादण करणाऱ्या व शाळेला तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर नामलौकिक प्राप्त करुन देणाऱ्या विद्यार्थ्यांना पदके, चषक व भेटवस्तु देऊन गौरवीत करण्यात आले.
पूर्व प्राथमिक विभागाचा पारितोषिक समारंभ दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला,त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी हरणाताई जोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता सपकाळे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रक्षा पवानी यांनी केले.
प्राथमिक विभागाचा पारितोषिक समारंभ दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी गुड शेपर्ड अकॅडमी, चाळीसगावचे प्राचार्य श्री. डॅनियल दाखले सर तर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री.शांतबन बारीस सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तृप्ती पाटील व सौ. सोनल बागुल यांनी केले.
माध्यमिक विभागाचा पारितोषिक समारंभ दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी बीपी आर्ट्स, एसएमए सायन्स, केकेसी कॉमर्स महाविद्यालय चाळीसगावचे प्राध्यापक डॉ.श्री.राहुल कुळकर्णी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रणजित सुर्यवंशी यांनी केले.
शाळेचे प्राचार्य श्री. डॅनियल दाखले सर यांच्या मार्गदर्शना खाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी शाळा प्रांगणात छान सजावट केली होती. पालकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले. व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.
