संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – दिनांक 23 जुन रोजी चाळीसगांव तालुका बुद्ध विहार निर्माण समिती ची प्रथम बैठक समितीचे अध्यक्ष धर्मभुषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव येथे संपन्न झाली.
बैठकीत नियोजित बुद्ध विहार उभारण्याबाबत खालील मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात बुद्धविहार साठी तालुक्यात 10 एकर जमीन खरेदी करणे, त्या जमिनीवर 10 कोटी चे भव्य बुद्ध विहार निर्माण करणे,
या बुद्ध विहारात तथागत बुद्ध आणि विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी तत्त्वांचा , मानवी कल्याणाच्या विचारांचा अभ्यास देणारी इंन्स्टिट्यूट चालविण्यात येईल अशी व्यवस्था करणे, तालुक्यातील व सर्व गावातील तसेच शहरातील सर्व वॉर्डातील सक्रिय लोकांना या समितीत सामावून घेतले जाणार आहे त्यासाठी समितीच्या दर पंधरा दिवसात बैठका आयोजित केल्या जाणार आहेत, चाळीसगांव तालुका बौद्ध पंचायत चे अध्यक्ष माजी आमदार आण्णासाहेब घोडे हे या समितीचे मार्गदर्शक राहतील आदी विषयावर सविस्तर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.
त्यानंतर समितीची कार्यकारिणी निवड करण्यात आली सचिव पदी सुधाकर मोरे, कोषाध्यक्ष रविंद्र निकम, संपर्कप्रमुख सूर्यकांत कदम (पत्रकार), महेंद्र यशवंत जाधव, अनिल पगारे भाऊसाहेब, अतुल बागुल, सुमित सोनवणे, प्रदीप मोरे ,मनिष पगारे, संघटक बाबा पगारे, राजू खरात, प्रविण जाधव, मयुर बागुल, निखिल घोडेस्वार, अवधेश बागुल, सौ.शालिनीताई खेडकर,
सदस्यपदी विशाल पगारे, गणेश देवरे, रविंद्र भालेराव, संदीप बागुल, दिलीप चव्हाण, भास्कर जगताप, नितिन शेलार तर सल्लागार म्हणून सुरेश खेडकर यांची निवड करण्यात आली असून पुढील 15 दिवसात पुन्हा बैठक आयोजित करून या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी असे आवाहन धर्मभुषण बागुल अध्यक्ष चाळीसगांव तालुका बुद्ध विहार समिती मो.9921323281 यांनी केले आहे.
