पतोंडा(चाळीसगाव) -दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी चाळीसगांव तालुक्याचे सुपुत्र शिवाजी लोटन पाटील यांना धग चित्रपटानंतर भोंगा या चित्रपटासाठी पुन्हा नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यांचा सत्कार आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते पातोंडा ग्रामपंचायत येथे करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती गटनेते संजय भास्कर पाटील, उपसरपंच दीपक पाटील, माजी सरपंच देविदास महाजन, कैलास महाजन, प्रभाकर पवार, छोटू पाटील, धीरज जोशी, शरद पाटील, विशाल सोनवणे, काशिनाथ शिरसाट, बळीराम महाजन, भागवत पाटील नाशिक, अशोक अमृतकर हे उपस्थित होते.

