अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चाळीसगाव येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी चि. अर्णव भुषण चौधरी याने नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या आय. टी. एस. सी. (भारत प्रज्ञाशोध परीक्षा) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अर्णवने 200 पैकी 188 गुण मिळवत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे.
अर्णव हा श्री. साहेबराव सुपडू चौधरी वाडेकर यांचा नातू असून, श्री. भुषण चौधरी (माध्यमिक विद्यालय, पातोंडा) आणि सौ. पुनम चौधरी (जि.प. शाळा, टेकवाडे बुद्रुक) यांचा सुपुत्र आहे.
या उल्लेखनीय यशामध्ये अर्णवच्या शाळेचे प्राचार्य घोरपडे सर, शिक्षकवर्ग तसेच आजी–आजोबांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले. अर्णवच्या या यशाबद्दल शाळेसह ग्रामस्थ, शिक्षक व नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
