संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अंध शाळेतील विद्यार्थ्यांसाठी फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आज देखील प्रेरणा देणारे असून त्यांच्या कार्याची थोडक्यात आठवण करून दिली.या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष किशोर जाधव, चाळीसगाव तालुका अध्यक्ष खुशाल मोरे, रैफदादा पठाण, अबरार खान, विशाल मरसाळे, सागर भिसे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाने समाजातील तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करण्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे तालुका अध्यक्ष खुशाल मोरे यांनी सांगितले.
