अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माध्यमिक मुख्याध्यापक श्री. सतिष पाटील व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राथमिक मुख्याध्यापक श्री.तुषार खैरनार व अधिक्षक श्री.विनोद देसले यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन केले.
कार्यक्रमात पोवाडा, गायन , नाटक, लेझीम पथक, ढोल पथक, नृत्य व श्री.रमाकांत कापडणीस, दिपमाला जाधव यांनी गीत सादर केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र सूर्यवंशी यांनी मांडले तर शिवरायांचे शिवचरित्र श्री.सागर बोरसे, शाळेतील विद्यार्थी राधिका पावरा यांनी मांडले.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन पाटील यांनी तर आभार श्री. प्रशांत पाटील यांनी मानले.
