दौंड पोलिसांच्या वतीने पोलीस पाटलांचा सन्मान.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड:-दौंड मधील पोलीस पाटलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निस्वार्थपणे बजावले व जनतेला व आपल्या गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तसेच वेळ प्रसंगी रात्रीच्या वेळी गावतील ग्रामसुरक्षा दल सदस्यांना साथीने गस्त घालने आदी कामे उत्तम रित्या पडणाऱ्या पोलीस पाटलांनी त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली त्या अनुषंगाने दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक पालवे,व लोंढे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.गावातील काही अडीअडचणी असतील तर दौंड पोलीस स्टेशनला कळवावे त्याची योग्य ती दखल घेऊन ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.व येणारी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात पोलिस पाटलांना सूचना देण्यात आल्या.पोलिस पाटलांनी स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणींचा ही उलगडा केला व स्थानिक राजकीय कार्यकर्ते अडचणी आणतात त्याला योग्य त्या प्रकारे आळा घालावा असेही पोलिस पाटलांनी नमूद केले. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करून कोव्हीड च्या काळात ज्या 20 पोलिस पाटलांनी आपला जीव गमावला त्यांची आठवण करून हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते..