संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील पाटणा जंगलात पाटणा राउंड स्टाफ जंगलात गस्त घालत असतांना या गस्त दरम्यान 3 व्यक्ती संशयित रित्या जंगलात काही साहित्य घेऊन फिरत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या कडे जात असताना ते पाळल्याने संशय आल्याने पाठलाग केला असता 2 फरार झाले तर एकाला ताब्यात घेत विचारपूस केली असता चंदन चोरीच्या उद्देशाने आले असल्याचे कळल्याने पुढील कारवाई सुरू.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव दि 02 सप्टेंबर 2023 रोजी सांयकाळी दरम्यान -चाळीसगाव (वन्यजीव) वनक्षेत्रांकन नियत क्षेत्र: पाटणा’ राखीव’ वनरक्षक क्रमांक: 305 पाटणा राऊंड स्टाफ जंगल भागात गक्त’ करित असतांना डोंगरी नदी-चे वरिल भागात काही अज्ञात इसम यांची चाहुल लागताच पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता चंदन तस्कर तीन आरोपी पैकी दोन फरार झाले सखाराम श्रवण गावंडे रा.अबांना ठाकुरवाडी ता. कन्नड चि. छत्रपती संभाजी नगर यास ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी आरोपी जवळ दोन लोखंडी कुऱ्हाड,1 करवत नॉयलान पिशवी , 10 फूट काळ्या रंगाची सुती दोरी इत्यादी साहित्य व हत्यार आढळले. उर्वरित फरार दोन्ही आरोपीचा शोध सुरु आहे.सदर बाबतीत आरोपी विरुद्ध ऋतिक गंभीर तडवी वनरक्षक पाटणा यांनी प्रथम गुन्हा क्रमांक. 05/2023 दि. 02 सप्टेंबर 2023 अन्वये भा व अ 1927 व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1927 अन्वये गुन्हा नोंद केल्यान डि.के. जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी – (वन्यजीव) प्रभारी यांनी सदर आरोपीस मा न्यायदंडाधिकारी वर्ग-1 चाळीकगांव याचे न्यायालयात हजर केले असता, ‘आरोपीला चार दिवसांची वन कोठडी सुनावली सदर कार्यवाही, डि.के.जाधव, वनपाल पाटना (अति कार्यभार) वनपरिक्षेत्र- अधिकारी चाळीसगाव (वन्यजीव) (अति कार्यभार),आर बी तडवी,वनरक्षक पाटणा, ए.बी. मोरे विशेष वनरक्षक पाटणा, यु. आर. सोनवणे, वनरक्षक तपासणी नाका पाटणा, तसेच रोजंदारी संरक्षण वनमजूर रमेश राठोड, राजाराम चव्हाण,वाल्मीक तलवारे, वाहन चालक बापु अगोने यांनी केली असुन पुढील कार्या मा. विभागिय वनअधिकारी (वन्यजीव) विभाग, औरंगाबाद एम. बी. नाईकवाडी सो,मा. सहायक वनरक्षक’ (वन्यजीव) कन्नड प्रभारी – श्री. अभय अटलक सो तसेच मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे सो चाळीसगाव यांचे मार्गदर्शना खाली डि.के. जाधव’ वनपाल पाटणा करित आहे.
