संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगांव(प्रतिनिधी)- शहरातील जळगांव एमआयडीसी पोलिसांनी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी बायोडिझेल अवैध वाहतूक करणारे 2 टँकर जप्त केले आहेत.या कारवाईत 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे सोबतच त्यांच्या कडून बायोडिझेल टँकर सह एकूण 47 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. या कारवाईत सहभागी असणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांचे देखील कौतुक पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले आहे, सहकाऱ्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे अश्या अनेक कारवाया यशस्वी होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपींविरुद्ध योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल आणि त्यांच्या अवैध कृतींची पूर्ण चौकशी केली जाईल. पोलिसांनी अशा प्रकारच्या गैरकायदेशीर कृतींविरुद्ध कडक नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून कारवायांचा धडाका सुरू आहे.
