अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
महालक्ष्मी मंडळातर्फे नवरात्र निमित्त भजन संध्या
जळगाव (प्रतिनिधी) – श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, महाजन नगर रामेश्वर कॉलनी तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त श्रीशाम सुमरण भजन संध्याचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अल्पेश भाऊ देवरे व गुरुकृपा डेअरीचे संचालक अभिषेक भाऊ कासार यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत भाऊ नाईक यांनी आमदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाविकांच्या उपस्थितीत सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय झाले.
दरम्यान, महालक्ष्मी मंडळातर्फे २७ सप्टेंबर २०२५ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी केले आहे.
