अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील माध्यमिक विद्यालय देवळी येथे इयत्ता १० वी वर्ष २०००/२००१ सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अगदी उत्साहात पार पडाला. कार्यक्रम तत्कालीन बॅचचे मुख्याध्यापक ए बी सुर्वे सरांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहूणे म्हनून माजी शिक्षक एन टी लोहार सर, शिरोडे सर, एस एस पाटील सर, ए के पाटे सर, बी बी जाधव सर, कोळेकर मॅडम, बी आर पाटील सर, शाळेचे मुख्याध्यापक अमृतकार सर, पी के रणदिवे सर यांई विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
DJ अन भेटवस्तू न घेता त्या पैशातून तत्कालीन बॅचचा माजी विद्यार्थी समाधान विट्ठल पाटील याचे दुर्दैवी निधन झालेले आहे, त्याच्या परिवाराला 15 हजार रुपयांची मदत करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सकाळी प्रार्थना अन राष्ट्रगीत म्हनून कार्यक्रमाची सुरूवात केली. सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला अन सर्व विद्यार्थी अगदी शाळेत असल्यागत रमून गेले होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला त्या नंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी…
विनोद चव्हाण, अतुल पाटील,गणेश पाटील , योगेश रणदिवे, तनुजा पाटील सोनाली रणदिवे, विभावरी रणदिवे, वर्षाली पाटील, संभाजी पाटील, गणेश रणदिवे, मनोहर पांगारे अदींनी परिश्रम घेतले.
२००१ बॅचचा स्नेह मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, इतर अवास्तव खर्च टाळून सर्वांनी दिवंगत मित्र समाधान पाटील याच्या परिवाराला १५ हजार रुपये मदत म्हणून दिली. (अतुल पाटील माजी विद्यार्थी)
