अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील स्टेशन रोड वरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर रस्त्याच्या कडेला लोखंडी पाईप,सी चॅनल लावल्याने कॉम्प्लेक्स मध्ये आलेल्या ग्राहकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला लावावी लागत असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून त्या मोहिमेअंतर्गत फरशी पुलावरील अतिक्रमण रहदारीस अडथळा निर्माण करत असल्याने साफ करण्यात आले.पण स्टेशन रोड वरील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर लावलेल्या या लोखंडी पाईपांमुळे तसेच सी चॅनलमुळे वाहने रस्त्याच्या कडेला लाऊन खरेदीसाठी ग्राहक कॉम्प्लेक्स मध्ये जात आहेत,यामुळे अर्धा रस्ता या पार्किंग मुळे झाकला जात आहे आणि आर्ध्या रस्त्यातून वाहनचालक मार्ग काढत वाहन चालवित असतात यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.
नेमकं ते लोखंडी पाईप व सी चॅनल कोणी टाकले आहेत आणि का टाकले आहेत? या प्रकारे रस्त्याला अडथळा ठरणारे नियम बाह्य मनाला वाटेल ते करून नाहक कॉम्प्लेक्स मध्ये येणाऱ्या ग्राहकांचे हाल तर केले जात आहेत सोबत रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांचे देखील हाल करणे सुरू आहे तरी नगरपालिका प्रशासनाने तत्काळ या कडे लक्ष देत ते लोखंडी पाईप,सी चॅनल काढून पार्किंगला जागा मोकळी करून देत जण सामन्यांना होणार त्रास थांबविण्याची मागणी होत आहे.
वाहन रस्त्यावर तर पार्किंग ची जागा कुठे…
पार्किंग असल्याशिवाय व्यापारी कॉम्प्लेक्स चे बांधकाम कसे झाले? जर पार्किंग ला जागा आहे तर ती कुठे आहे? पार्किगला जागा नसलेले हे व्यापारी कॉम्प्लेक्स नेमकं नगरपालिका चे कॉम्प्लेक्स आहे? म पार्किंग ची जागा गेली कुठे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत.अनधिकृत लोखंडी पाईप,सी चॅनल लावल्यामुळे पार्किंग रस्त्यावर आली आणि कॉम्प्लेक्सच्या पार्किंगचा जागेचा विषय लोकांच्या नजरेत आता तरी संबंधित विभाग आपले कार्य करेल ही अपेक्षा….
