अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता वाघाळी गावात भव्य रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चचे नेतृत्व ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी केले. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावातील मुख्य रस्ते, बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणांतून शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रूट मार्चला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत सण-उत्सव शांततेत व परस्पर सौहार्दाने पार पाडावेत, असे आवाहन केले.
सणासुदीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, गावात शांती आणि सुरक्षिततेचे वातावरण कायम राहावे यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचा विश्वास पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांना दिला. यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली दिसून आली.
