आमचा आता एकच नारा, आन्यायाला नाही देणार थारा.

Read Time2 Minute, 40 Second

दौंड(प्रतिनिधी):- धनगर समाज व वंजारी समाज यांच्या मुलांवर केलेल्या आन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज सोमवार दिनांक 9.3.2020 रोजी सकाळी आकरा वाजता स्थळ. तहसील कार्यालय दौंड. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक गट व पदाच्या भरती प्रक्रियेत एन टी (क) तसेच एन टी (ड) प्रवर्गातील विद्यार्थ्यां वरील झालेला अन्याय दुर करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी निवेदन देण्यात आले,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या आराजपत्रीत गट व पदासाठी पुर्व परिक्षा 2020 ची जाहिरात (क 05/20) प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक ( गट व) ( अराजपत्रीत ) पदाच्या 650 जागांची भरती करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहे. एकुण 650 जागांन पैंकी 475 जागा ह्या विविध प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. परंतु शासन निर्णय प्रमाणे एन टी क प्रवर्गासाठी 22 जागा आरक्षित असायला हव्या होत्या. तसेच एन टी (ड) प्रवर्गासाठी. 2 % जागा राखीव असताना ऐक ही जागा आरक्षित दाखवली नाही. त्या मुळे या परिक्षेची तयारी करीत असलेल्या उमेदवारांसाठी प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे. त्या मुळे धनगर समाज व वंजारी समाजाच्या मुलांवर आन्याय झालेला आहे. तरी आम्ही सर्व या निवेदना द्वारे विनंती करतो कि सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित वरिष्ठ विभागाला सुचीत करावे. संबंधित सुधारित जाहिरात न निघाल्यास धनगर समाज. वंजारी समाज व राष्ट्रीय समाज पक्ष दौंड तालुका दौंड तालुक्यात अंदोलन केले जाईल.श्री किसन बबन हंडाळ राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष दौंड विधानसभा

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post आदर्श व कर्तृत्ववान पिढी घडविण्याची जबाबदारी स्त्रियांची – सौ.प्रतिभा ताई चव्हाण
Next post आमदार राहुल कुल व प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बायपास मार्गे शहराबाहेरून होईल
error: Content is protected !!
%d bloggers like this: