अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे राज्यव्यापी सेवाबंद आंदोलन
चाळीसगाव(प्रतिनिधी) :महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी बी.एच.एम.एस. – सी.सी.एम.पी. डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र शाखेने तीव्र निषेध नोंदवला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व एलोपॅथी डॉक्टर व वैद्यकीय संघटनांनी एकत्र येत १८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यव्यापी सेवाबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या मते, केवळ १ वर्ष कालावधीत फार्माकॉलॉजीचा तोकडा अभ्यास करून होमिओपॅथी पदवीधारक डॉक्टरांना एमबीबीएस, एमडी, एमएस, एमसीएच, डीएम व डीएनबी डॉक्टरांच्या समकक्ष कौन्सिलमध्ये नोंदणी देणे हे रुग्णांच्या सुरक्षिततेस धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हा आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
शासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर बेमुदत सेवाबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे राज्यभरातील वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चाळीसगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय…
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले ट्रामा केअर सेंटर ग्रामीण रुग्णालय मात्र रुग्णांच्या सेवेत नेहमी पुरवत असलेल्या सुविधांनाअविरत सुरू असणार असून ग्रामीण रुग्णालयातर्फे रुग्णांच्या सेवेत खंड पडणार नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
