अधिकार आमचा न्यूज पोर्टल
दौंड प्रतिनिधी पवन साळवे
“दौंड रिक्षा महासंघ” गुरूवार दि.28/5/20 रोजी सकाळी 11.30 बारामती उप- प्रादेशिक परीवहन (R.T.O).विभाग या ठिकाणी मा.श्री.प्रशांत (नाना) सातव यांच्या वतीने दौंड, बारामती ,इंदापूर तालुक्याच्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकरी यांची बैठक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.धायगुडे साहेब,मा.साखरे साहेब,मा.मुळे साहेब ,मा शिंदे साहेब,
बारामती येथील मा.श्री प्रशांत (नाना)सातव तसेच आपल्या दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक मा.प्रा.डॉ.भिमराव मोरे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी रिक्षा चालकांनी घ्यावयाची काळजी आणि नियम सर्वांना समजावून सांगितले आणि त्या संदर्भाचं पत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रकाशित केले आहे त्या पञकाच्या प्रती श्री नाना सातव मित्र परिवार यांच्या वतीने रिक्षा चालकांसाठी देण्यात आले व प्रशासन आपणास मदत व सहकार्य तसेच रिक्षा चालकांना रिक्ष व्यवसाय सूरू करण्याबाबत लवकरच आनंदाची बातमी
देणार असल्याचे सांगितले.
तसेच या बैठकीस दौंडमधून दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक मा.प्रा.डॉ.भिमराव मोरे सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडमधून बाबासाहेब कोरी ,गौतम गायकवाड ,हिरा अयवळे तसेच उत्तम लोंढे उपस्थित होते. शेवटी मोरे सरांच्या वतीने रिक्षा चालकांच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले व ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन परिवहन अधिकऱ्यांनी दिले.