उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला संवाद.

Read Time3 Minute, 57 Second

मुंबई:-कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे परीक्षेबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षेचे नियोजन, नियंत्रणासाठी समिती या समितीत मुंबईचे डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणेचे डॉ. नितीन करमळकर, एसएनडीटीच्या शशिकला वंजारी, शिवाजी कोल्हापूरचे देवानंद शिंदे या विद्यापीठांच्या कुलगुरूंसह तंत्रशिक्षणचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षणचे संचालक धनराज माने यांचा समावेश- मंत्री उदय सामंत.कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालय, सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक ढकलले पुढे. मात्र, परीक्षा रद्द होणार नसून विद्यार्थी, पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करणार.राज्यातील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव, स्थानिक परिस्थिती यांचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वर्षाचे नियोजन असा अहवाल तयार होणार. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव आणि मंत्री यांना अहवाल सादर झाल्यानंतर याबाबत निर्णय.कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर अकृषी विद्यापीठांमध्ये विविध आजाराच्या चाचण्या घेता येतील अशा स्वरूपाच्या मल्टिपर्पज लॅब सुरू करण्याच्या यांच्या सूचना. त्यासाठी सर्व परवानग्या देणार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे अशा प्रकारची लॅब सुरू.आरोग्य यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाकडून प्रयोग. आई-वडिलांची परवानगी घेऊन एनएसएसच्या २७ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. आरोग्यसेवेसाठी विद्यार्थी झाले सज्ज. याच धर्तीवर इतर विद्यापीठांमधील विद्यार्थी आरोग्य सेवेसाठी घेण्याबाबत अहवाल द्यावा.COVID19 उद्रेकाच्या मानसिक परिणामास सामोरे जाण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाकडून वेब-आधारित मानसिक आरोग्य सहाय्य सेवा उपलब्ध. अशा प्रकारे इतर विद्यापीठांनीही सुविधा सुरू करावी- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश.कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून काटेकोर उपाययोजना. या संकटाच्या मुकाबल्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री-उदय सामंत यांचे आवाहन.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post पुणे विभागात 65 हजार 200 स्थलांतरित मजुरांची सोय ; 1 लाख 19 हजार मजुरांना भोजन
Next post गरीब व गरजू लोकांना 1 महिना पुरेल एवढा किराणा वाटप करून 14 एप्रिल साजरी करणार-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) व DBNग्रुप दौंड
error: Content is protected !!
%d bloggers like this: