
औदुंबर च्या अध्यक्षपदी ऍड मोहनशुक्ला, सचिवपदी विलास मोरेतर सहसचिवपदी कुंझरकर यांची निवड
एरंडोल(प्रतिनिधी): एरंडोल येथील औदुंबर साहित्य रसिक मंचची सर्वसाधारण सभा 2 फेब्रुवारी रोजी सर्वोदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झाली वैभवशाली परंपरा असलेल्या या साहित्य रसिक मंचच्या नूतन पुढील पाच वर्षासाठी च्या कार्यकारिणीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. येथील सुप्रसिद्ध वकील मोहन शुक्ला यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली तर सचिवपदी साहित्यिक तथा वकील विलास मोरे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी प्राध्यापक वा ना आंधळे व निवृत्त तहसीलदार अरुण देवराम माळी यांची निवड झाली तर औदुंबर साहित्य रसिक मंचच्या सहसचिवपदी शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी साहित्यिक किशोर पाटील कुंझरकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी कवी प्रविण महाजन कोषाध्यक्ष म्हणून सय्यद जाकीर हुसेन तर मंडळाचे सल्लागार म्हणून माजी नगराध्यक्ष विजय अण्णा महाजन उद्योजक विजय सदाशिव जाधव, पत्रकार जावेद अब्दुल कादर मुजावर ,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित दादा पाटील यांची निवड झाली.
संस्थेचे अध्यक्ष मोहन शुक्ल यांनी मनोगत व्यक्त करताना औदुंबर साहित्य रसिक मंचच्या साहित्यिक वाटचालीचा घोषवारा मांडला. तसेच संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवसीय साहित्य संमेलन एरंडोल येथे मार्च अखेरीस घेण्यात येणार असून त्या संदर्भात उपस्थित सर्वांनी विचार विनिमय केला. यावेळी संस्थेचे सर्व आजी माजी सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांसह शहरातील शंभराहून अधिक मान्यवरांची उपस्थिती होती .सर्वसाधारण सभा आभार प्रदर्शन नूतन सह सचिव कवी किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केले.

Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना राहिलेली 75% भरपाई लवकरात लवकर द्यावी-आम आदमी पार्टी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)- सन 2021-22 मधील खरीप हंगाम कापूस पीक विमा राहिलेली 75% जोखीम स्तरनुकसान...
Average Rating