अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 12 जून रोजी ग्रामीण पोलीस निरीक्षक यांनी पथकासह चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये छापे टाकत अवैध दारू सह लागणाऱ्या रसायनाचा साठा केला नष्ट.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सांगवी, बाणगांव, खेरडे शिवारात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गावटी हातभट्टयांवर छापे टाकून एकूण 56 हजार रुपये किमतीचे सुमारे 1400 लिटर हातभट्टीची दारु तयार
करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व 9 हजार 800 रुपये किमतीचे 14 ड्रम असा एकूण 65 हजार 800 रुपये
किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. सदर हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या इसमांचा शोध
घेऊन त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाणार असून सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे, जळगांव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भरत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक,श्री. लोकेश पवार, पोना शांताराम पवार, पोना देविदास पाटील, पोना भूपेश वंजारी, पोना ज्ञानेश्वर बडगुजर, पोना प्रेमसिंग राठोड यांनी केलेली आहे.