चंद्रकांत पाटील ,उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री , महाराष्ट्र राज्य यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-मा .चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे भारताच्या महामहीम राष्ट्रपती व महाराष्ट्राचे मा .राज्यपाल यांच्याकडे गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी केली आहे.
याविषयी सविस्तरपणे बोलताना राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की,मा .चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी भारताचे महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले ,कर्मवीर भाऊराव पाटील , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करताना ” शाळा सुरू करण्यासाठी भिक मागितली ” असा शब्दप्रयोग करून महापुरुषांचा अवमान केलेला आहे . शिक्षणासाठी भीक नव्हे तर विविध स्वरूपात देणग्या मिळाल्या . गोरगरीब वंचित घटकातील , गावकुसाबाहेर रहाणारे ,पालावर रहाणारे , उपेक्षित लोकांच्या मुलांच्या शिक्षणाची संधी निर्माण करत होते . ऐतिहासिक वस्तुस्थितीत या महापुरुषांचे कार्य, आंदोलन हे आत्मसन्मान व स्वाभिमान निर्माण करणारे आहे .या महापुरुषांनी त्यांच्या जीवन कार्यात कोणाचीही कधीही लाचारी केलेली नाही .शिक्षण क्षेत्रातील काम करणाऱ्या महापुरुषांचा उल्लेख करताना त्यांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा उल्लेख करून अवमान केला आहे .बहुजन समाजातील या महापुरुषांनी सर्व देशवासीयांसाठी काम केले असून आजही त्यांचे कार्य दीपस्तंभसारखे प्रेरणादायी व स्वाभिमान निर्माण करणारे आहे .देशाचे प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांचा अपशब्द वापरून अवमान केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा . चंद्रकांत पाटील यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी केली आहे .यावेळी राज्य सल्लागार दिगंबर काळे उपस्थित होते .