अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शहा
चाळीसगांव(दि 1)-चाळीसगाव येथे समता सैनीक दलातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठींबा
दि.1ऑक्टोबर 20 रोजी समता सैनिक दलाच्या चाळीसगाव तालुका शाखेने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जाहीर पाठिंबा घोषित केेला, मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे .
त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.
आम्ही अशी ही मागणी करीत आहोत की ,हे आरक्षण देत असताना ओबीसी समाजाला जे प्रचलित 19 टक्के आरक्षण दिले गेले आहे .त्यास कसला ही धक्का न लागता कामा नये.
ओबीसी समाजाला 346 जातींसाठी 19 टक्के आरक्षण देवून त्यांच्यावर देखील अन्यायच झालेला आहे.
म्हणून मराठा समाजाला कोणतीही अट न घालता त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे.
तोच नियम ओबीसी समाजासाठी देखील लावून त्यांचे देखील आरक्षणाची टक्केवारी वाढविण्यात यावी.
विशेष महत्त्वाची बाब अशी की ,महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 26 सप्टेंबर 2008 रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकाद्वारे ओबीसी च्या 346 जातींची यादी जाहीर केलेली आहे .
यातील काही हाती वगळून त्यांना विमुक्त जाती संवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.
या यादीतील अनुक्रमांक 83 वर कुणबी या जातीचा उल्लेख देखील आहे. त्यात पोट जाती म्हणून लेवा पाटील ,लेवा कुणबी ,लेवा पाटीदार ,कुणबी मराठा ,मराठा कुणबी अशा पाच जातींचा उल्लेख केलेला आहे.या मराठा समाजाच्या जाती आहेत.
म्हणजेच मराठा हा समूह ओबीसी संवर्गात येतो .
ही बाब दुर्लक्षित करण्यात येवू नये.
म्हणून मराठा समाजास त्यांच्या संख्येच्या प्रमाणात स्वतंत्ररीत्या आरक्षण देण्यात यावे.
यावर अंमल बजावणी न झाल्यास मराठा व ओबीसी समाजाच्या या मागणी साठी समता सैनिक दल देखील त्यांच्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी राहील .
कृपया ,शासनाने याची नोंद घेवून मराठा समाजास न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,
या निवेदनावर धर्मभूषण बागुल ,विजय निकम ,भाईदास गोलाईत ,स्वप्नील जाधव ,विष्णु जाधव ,सचिन गांगुर्डे,बाबाझ पगारे ,दीपक बागुल ,जीवन जाधव ,सचिन मोरे ,प्रकाश बागुल व विशाल पगारे या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
यावेळी मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण याबाबत सविस्तर भूमिका धर्म भुषण बागुल यांनी स्पष्ट केली .भविष्यात याबाबत होणाऱ्या आंदोलनात समता सैनिक दल सहभागी देखील असेल असे ही त्यांनी जाहीर केले.