संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील तापमानाने ४३.३ अंश ओलांडले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे व तापमानाच्या झळा बसू लागल्या आहेत तसेच तालुक्यातील ३२ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.यामुळे जवळपास ४५ टँकरने या गावांना पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
सद्याची परिस्थिती पाहता तीव्र पाणीटंचाईची भिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात जसजसा उन्हाचा तडाका वाढत आहे. तसतशी पाणीटंचाई गावांची संख्या वाढत आहे.जिल्ह्यात ६९ गावांना ८९ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहेत त्यात सर्वात जास्त संख्या चाळीसगाव तालुक्यातील गावांची आहे.
२०२३ मध्ये कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक होतील. यामुळे जिल्हा प्रशासनाने उपयोजना म्हणून जानेवारी २०२४ पासूनच सर्व नगरपालिका, नगरपंचायतींना पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे आदेश दिले होते. यामुळे चाळीसगाव शहरात देखील ४ ते ५ दिवसात पाणीपुरवठा होत आहे.शहरात जरी पाणीपुरवठा व्यवस्थितरीत्या होत असला तरी तालुक्यात ३२ गावांना टँकरने पाणपुरवठा केला जात आहे यामुळे शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरावे व आपल्या परीने जनजागृती देखील करावी.
शहरात नळांना तोट्या नाही,नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष…..
चाळीसगाव शहरात ४ ते ५ दिवसांनी नळांना पाणी येत असून पाणी टंचाईचा त्रास आजुन शहरवासीयांना झालेला नाही,मात्र तालुक्याची परिस्थिती पाहता पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरात नळांना तोट्या लावण्याची गरज असून नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे व नागरिकांमध्ये जनजागृती करणे देखील आवश्यक आहे.