चिंचवड वाहतूक विभाग चिंचवड शाखेमार्फत महिनाभर चाललेल्या वाहतूक सुरक्षा अभियानाचा समारोप
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
चिंचवड(प्रतिनिधी):-काल दिनांक 17 /2/2021 बुधवार रोजी चिंचवड शाखेच्या वाहतूक विभागात दिनांक 18/1/2021 ते 17/2/2021 या कालावधीत राबविले गेलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानात पोलीस निरीक्षक श्री राम राजमाने सर व पोलीस उपनिरीक्षक श्री संजय जाधव, कारले मेजर व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवून वाहतूक सुरक्षेची जाणीव व जबाबदारी याबाबत जणजागृती घडवून आणली गेली.
याप्रसंगी वाहतूक शाखेचे सर्व पोलीस अंमलदार, वाहतूक समिती सदस्य, श्री शरद लूनावत, श्री गजानन चिंचवडे, श्री लाला चिंचवडे, सौ निर्मला जगताप, श्रीमती अंजू सोनवणे, श्री तानाजी वाल्हेकर, श्री अभिजीत बोंडे, श्री धनंजय कुलकर्णी, सतीश भारती यांचे विशेष सहकार्य लाभले.
समारोपप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री राम राजमाने सरांनी नागरिकांना विशेष मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे संयोजन व आभार पोलीस उपनिरीक्षक श्री संजय जाधव यांनी केले.
कार्यक्रमांची अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली