अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(विशेष)-चार दशकांपासून असलेली प्रतीक्षा दि 26 सप्टेंबर 2021 रविवार रोजी संपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन होताच शिवप्रेमींनी एकच गर्दी केली शहराला आले यात्रेचे स्वरूप
प्रत्येक शिवप्रेमींची इच्छा होती की शहरातील मुख्य चौकात सिग्नल पॉईंट येथे महाराजांचा अश्वरूढ पुतळा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून शिवप्रेमींनी निवेदन दिलीत,आंदोलन केलीत त्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले नियोजित जागा मिळाली,भव्य अशे किल्ल्यासारखे स्मारक बांधण्यात आले मात्र प्रतीक्षा सुरूच होती शेवटी तो दिवस आला महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे आगमन होणार असल्याची बातमी संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणि शिवप्रेमींनी आनंदोत्सवाची तयारी सुरू केली शहरात पुतळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले फुलांचा वर्षाव करत शिवप्रेमींनी स्वागत केले शहराला यात्रेचे स्वरूप आले होते शिवप्रेमींनी ह्या कधी ना विसरता येणाऱ्या क्षणात मग्न होत स्मारकाच्या जागी बांधलेल्या भव्य अशा चबुतऱ्यावर महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला,
महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यासाठी सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांची स्वागत समिती तयार करण्यात आली होती.या स्वागताचे नियोजनासाठी चार दिवस पुर्ण वेळ समिती सक्रिय होती,शिवनेरी फाउंडेशन तर्फे चाबूतर्याची सजावट करण्यात आली रात्री महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर ठेवण्यात आला . समितीने घेतलेली जबाबदारी भक्कमपणे पार पाडली. या कामी मा. खासदार उन्मेष पाटील , मा.आमदार मंगेश चव्हाण आणि माजी आमदार राजीव देशमुख यांनी योग्य पुढाकार घेवून समितीला भक्कम साथ दिली . नगराध्यक्षा सौ. आशालता ताई चव्हाण या समिती चे अध्यक्ष होत्या.त्यांनी पूर्णवेळ देवून समितीच्या कामात भाग घेतला. संभाजी सेनेचे बापूसाहेब शिरसाठ ,रयत सेनेचे गणेश भाऊ पवार , संभाजी ब्रिगेड चे अरुण दादा पाटील ,रयत क्रांती सेनेचे देवेंद्र भाऊ पाटील व पप्पु दादा पाटील या समिति सदस्यांनी खूप परिश्रम घेतले नपा चे अनेक नगरसेवक या कामी सक्रिय होते,त्यांनी नियोजनासाठी चांगले परिश्रम घेतले.