अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात गोवंश तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे रविवारी 15 जून रोजी रात्री गस्तीवर असताना गोवंश तस्करी करणाऱ्या इनोव्हा कारचा पाठलाग करत होते. तब्बल शेकडो किलोमीटरचा हा थरारक पाठलाग जळगाव ते अकोला पर्यंत सुरू राहिला.
अखेर अकोलाजवळ वाहन थांबवण्यात पोलिसांना यश आले. मात्र दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने अचानक गाडी रिव्हर्स घेत संदीप पाटील यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात त्यांना छाती, बरगडी, पाय व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. तरीही धाडस दाखवत त्यांनी एका आरोपीला वाहनासह ताब्यात घेतले; मात्र इतर तिघे आरोपी पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी नाकाबंदी केली होती, घटनास्थळी पंचनामा करत अकोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गोवंश तस्करांची हिम्मत इतकी वाढली आहे की, पोलिसांवरच थेट जीवघेणे हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
