पुणे:- दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथे राज्य शिक्षणसंचालक यांचे पत्रानुसार पुणे येथील त्यांच्या दालनात शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी ३८ शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीची बैठक दिनांक घेतली. दुपारी एक ते सहा पर्यंत चाललेल्या प्रदीर्घ बैठकीत सर्वच प्रलंबित प्रश्नांवर साधक-बाधक धोरणात्मक चर्चा झाली.राज्यातील प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी पदवीधर शिक्षक जुनी पेन्शन लागून नसलेले शिक्षक, रिक्त जागा,प्राथमिक शिक्षक पात्र बीएडधारक असून त्यांचे मधून केंद्रप्रमुख शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारीयांची पदे भरणे, राज्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संख्या कमी असून त्यांना इतर पुरस्कार प्राप्त व्यक्तीप्रमाणे कुटुंबीयांसह मोफत एसटी प्रवास सवलत मिळावी पूर्व दोन वेतनवाढी सुरू कराव्यात, राज्यातील पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट शासनाच्या मोफत गणवेश मोफत योजनेचा लाभ द्यावा,महाराष्ट्र राज्य दृक श्राव्य शिक्षण संस्था बाहुलीनाट्य विभाग व इतर विभाग पूर्ववत सुरू ठेवावे, जीवन शिक्षक मासिक संपादक मंडळावरतसेच प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर राज्य समन्वय समितीचा प्रतिनिधी नेमावा, शालेय शिक्षण विभाग व राज्य समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता या विषयावर राज्यव्यापी शिक्षण परिषदेचे आयोजन करणे, यासह अनेक प्रश्नांवर साधक-बाधक चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय प्रोसेडिंग सह शासनाकडे कळविण्याचे ठरले. राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे, राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ राज्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझर कर यांनी प्रास्ताविकातून प्रत्येक जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा मांडला तसेच चर्चेत सहभाग घेताना राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न व न्या याकडे शासनाचे लक्ष वेधले.यावेळी त्यांचे सह चर्चेमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष बबनराव भीमराव आटोळे बारामती,राहुल छबीलदास परदेशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे राज्य सहसचिव,एकता शिक्षक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर, मारुती आनंतराव हिंगणे महाराष्ट्र राज्य पदवीधर महासंघ , मंगेश नामदेव येवले, पदवीधर शिक्षक संघटना राज्याध्यक्ष मुकेश नारायण शिंपले जालना, विठ्ठल एक नाथ शेमे केंद्रप्रमुख संघ बीड, आदिवासी शिक्षक संघटनेचे रामचंद्र बबन शिंगाडे, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुण्याचे प्रकाश दगडू घोळवे, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे प्राध्यापक डॉक्टर सहदेव आत्माराम जाधवर, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघाचे अध्यक्ष इलाहोजुद्दिन फारुकी यांचे प्रतिनिधी मोहम्मद कादरी, आदिसह राज्य समन्वय समितीच्या सहभागी सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापले प्रश्न मांडले.
यावेळी प्रश्न मांडतांना शिक्षक संघटना चळवळीतील जळगाव जिल्ह्याचे अभ्यासू नेतृत्व मुलुख मैदान तोफ किशोर पाटील कुंझरकर यांनी इयत्ता पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना जातनिहाय विचार न करता सर्वच दाखल मुला-मुलींना सरसकट गणवेश राज्य शासनाने द्यावे ही आग्रही भूमिका मांडली .सावित्रीबाई फुले मुलींची उपस्थिती भत्त्यात वाढ करून ती पाच रुपये करावी किंवा त्या योजनेचा पुनर्विचार करावा तसेच शालेय पोषण आहार योजनेतील त्रुटी दूर व्हाव्यात तसेच राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना इतर पुरस्कार तीन प्रमाणे एसटी बस प्रवास मोफत सवलत मिळावी यासह पूर्ववत दोन वेतनवाढी सुरू करून आदर्श शिक्षकांना प्रत्येक जिल्ह्यात वेतनवाढीचा प्रस्ताव सरसकट मंजूर करण्यात यावे आणि बीएड पात्र शिक्षकांमधून पदोन्नत्या व्हावेत त्याच प्रमाणे जुनी पेन्शन योजना सुरू करावी व डीसीपीएस मध्ये कपात झालेल्या बांधवांना त्यांच्या कपातीचा हिशोब मिळावा अशी आग्रही भूमिका आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत मांडून राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझर कर यांनी राज्य शालेय शिक्षण विभागाचे लक्ष वेधले.बैठकीचे सर्व इतिवृत्त राज्य शासनाला लगेच कळविण्यात येईल तसेच खर्चिक मागण्या व बिनखर्चिक मागण्या याची वर्गवारी करून राज्य समन्वय समितीला प्रश्नांचे नियोजन माहिती शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली. यावेळी बोलताना राज्य शिक्षण संचालक दिनकर टेमकर म्हणाले की शासन शासनाच्या पातळीवर नाविन्यपूर्ण योजना राबवत असून गुणवत्ता केंद्रबिंदू म्हणून शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे यांचे नेतृत्वाखाली करीत असलेले काम सकारात्मक आहे सर्व प्रश्नांवर लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.राज्यात समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुन साळवे यांनी केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले. आभार इप्टा शिक्षक राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांनी मानले.