अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- शहरात अनेक ठिकाणी नवीन रस्ते तयार करण्यात आले असून,यामुळे वाहन धारक सुसाट सुटायला लागले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर ब्रेकर नसल्याने छोट्या मोठ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे,तरी रस्त्यावर आवश्यक असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याची माजी नगरसेवकाची नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देत मागणी.
दिनांक 9 जून रोजी माजी नगरसेवक चिराग शेख यांनी नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक सौरभ जोशी यांना निवेदन देत प्रभाग क्रमांक 10 मधील अनिल नगर,पवार वाडी तसेच ज्या ठिकाणी नवीन रस्ते तयार झाले आहेत,अश्या प्रत्येक आवश्यक असेल त्या ठिकाणी रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलतांना माजी नगरसेवक शेख यांनी सांगितले की माझ्या पुतण्याला देखील रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागले,अपघातात त्याचा हात मोडला होता,त्या नंतर काही दिवसांपूर्वी एका लहान बालिकेचा देखील अपघात होऊन डोक्याला मार लागला आहे.नगरपालिका प्रशासनाने जीवित हानी होण्याची वाट पाहत न बसता लवकरात लवकर स्पीड ब्रेकर लावावे.
यावेळी निवेदन देतांना रऊफ मामू,बबलू शेख तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
